असं फक्त वाटतं

बरसणाऱ्या आभाळाला हि बघ ना तुझी चाहूल लागली.....
थरथरली पानं,शहारला वारा.... थेंबांना पाहून माती नवरीसारखी लाजली....

कुणी होतं म्हणत,"वेड्या हे तुझे भास आहेत....." म्हटले मी..."तिचे भास पण जरा खास आहेत..."
ना हातात माझ्या सिगारेट...ना दारूचे ग्लास आहेत...
माझ्याकडे सहानभूती जगाची...खरंतर तिला खूप त्रास आहेत....


आताही सगळं अजून तितकंच ताजं आहे.... न मिळूनही...स्वप्नात मात्र सगळं माझं आहे...

असं काही असतं का कि..... जे आपण विसरलेलं असतं?  कुणास ठाऊक....'विसरलो'..असं फक्त वाटतं...
असं काहीच नसतं जे विसरलेलं असतं...खरंतर आतच शांत पसरलेलं असतं...

-- क्षण तुझे अन् माझे..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade