भेटला जर देव तरी.

भेटला जर देव तरी त्यालाही विचारेल , द्यायचे नव्हते प्रेम तर तू असे का केलेस ?
थोडा काळ सुखावून तू मला दुखी का केलेस ?  वाटत होते कधी कोणी आप्लेहे असावे ,
आपले हे घर कोनायाच्या तरी मनात असावे ,  आनंदी असता मी तेव्हा तिनेही बागडावे ,
दुखी असता मी तिने आसव गाळावे,  थकलो असता मी तिच्या कुशीत निजावे ,
उगाच रुसवे आणि भांडावे तिच्याशी मग जवळ करून प्रेमाने बोलावे य्तीच्याशी
संकटात असता मी तिने माझा आधार व्हावे , सुख , दुख आम्ही एक -मेकांना वाटावे ,
दिले होते देवा मला तू असे कोणीतरी , दिले होते एवढे सुख तू असे का केलेस ?
काही काळ सुखावून मला दुखी का केलेस ?  सुखी असता मी तिची उणीव भासते .
दुखी असता मी तिची आठवण सतावते सांग न , सांग न तू असे का केलेस... ?
Previous Post Next Post