प्रेमात बिचारा फसला

तो रस्ता मला पाहून आज हसला, म्हणाला प्रेमात बिचारा फसला...
हो, ती हवा आजही तिथेचं होती, नेहमी तुझे केस विसकटणारी..
तो गाडयाचां गलकाही तिथे होता, रोज ... तुझ्या माझ्या वादंवर हसणारा..
त्या वळणाने मला आवाज दिला, पण आज मी मागे वळून पाहीलचं नाही..
रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या, पण  आज कोणी माझ्याकडे पाहीलचं नाही..
आज किंमत कळाली तुझ्या सोबतीची मला, आज सारखं काही चुकल्या सारखं वाटतं होतं..
पावले चालत होती पण वाट संपेनाचं माझी, आज एक युदध हरल्या सारखं वाटतं होतं..
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकचं, रोज दोघं असतात पण आज हा एकचं..
उत्तर होत जरी एक एकटाचं असलो तरी, तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला..
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज असतेचं ना सागराच्या भरती आहोटीला..
प्रेमात बिचारा फसला प्रेमात बिचारा फसला Reviewed by Hanumant Nalwade on June 27, 2012 Rating: 5
Powered by Blogger.