Thursday, June 21, 2012

माझे मलाच कळत नाही.

माझे मलाच कळत नाही, का असं होतं??
तू समोर आलीस की, काहीच सुचत नाही..
आणि जातेस दूर जेव्हा...
स्वताशीच बोलणे माझे काही केल्या थांबत नाही!!
खरंच गं...का असं होत??
... ... कधी,कधी मी तुझ्यावर खुप चिडतो
खुप रागवायचे तुला ...असे मनात् ठरवतो
त्यासाठी डोळ्यात प्राण् आणि
डोक्यात राख घालून तुझी वाट पाहतो...
आणि येतेस जेव्हा तु...
सारे काही विसरुन मीच्,"सॉरी!" म्हणतो!!!
खरंच सांग ना.. का असं होतं??
तुझा निरोप घेऊन परत येताना...दिवस ढळत आलेला असतो..
त्यावेळी खुप वाटंत की तुझे आणि माझे एक घरटे असावे
पण हा विचार मी करत नसतो...
कारण बसचा टाईम होत असतो
खरंच मला कळत नाही..का असं होतं???
कधी,कधी खुप काही ,बोलावंस वाटतं तुझ्याशी..
पण समोर नसतेस तु..तेव्हाच मी पेनहाताशी घेतो
आणि चार ओळी लिहुन काढतो..
चार म्हणता म्हणता खुपकाही लिहुन होतं
वेडे मन माझे त्यालाच कविता म्हणतं
खरंच कळले नाही मला...का असं होतं??
तसा मी हुशार आहे गं...
पण हे कोडे काही केल्या सुटत नाही...
वेड्या मनाला माझ्या दुरावा तुझा पटत नाही
खरंच कळले नाही मला...असं का होत होतं ??? ...
Reactions: