तू माझ व्हावं..

मला हि वाटायचं मी तुझं व्हावं.. तुला हि वाटायचं तू माझ व्हावं..
पण दोघांच्या नशिबाने ठरवलं... आपण कधी एक न व्हावं.....
=============================================
निराशेचे ढग तुझ आयुष्य व्यापून टाकतील
    एकटेपणाच्या वेदना तुझ जगणं अशक्य करतील
सगळा जग वैऱ्यासारख वागू लागेल
    तेव्हा फक्त एकदाच विश्वासाने बघ माझ्याकडे
आजही माझ प्रेम ... तुझी आतुरतेने वाट पाहत असेल
=============================================
मी पाहतोय आता तुला कूस वळवताना..
    माझ्यापासून दूर जाताना..
एका छताखाली असून भिन्न... भिन्न जगताना..
    मी तुझाच पण तू माझ्याशी फक्त समांतर चालताना.
=============================================
तू गेलीस त्या वाटेकडे बघण्यात वेगळीच मजा आहे
    डोळे मिटुन तुला आठवण्यात वेगळीच मजा आहे
माझ्या मुक्या तृषेला समजावण्यात वेगळीच मजा आहे
    तुझ्यासाठी मरण्यातही वेगळीच मजा आहे..
=============================================
कुणीही कुणाच नसतं तेव्हा  एकटेपण तरी आपलं असतं
आठवणी जपण्याकरता तेही  आपल्या मनाशीच झटत असतं
=============================================
आज तुझ नाव ऐकताच,  आठवणींच्या समुद्रात, परत एखदा वादळ आल...
वादळत अडकलेल्या नावे सारख,  आज माझ मन झाल.....
=============================================
होत असे कधी कधी..    जेव्हा शब्द परखे भासतात..
अन मनाशी बोलता बोलता..    फक्त अनुभवच जवळचे वाटतात..
=============================================
कश्या असतात ना आठवणी...   कोसळणार्‍या पावसा सारख्या...
येताना एक एक येतात..   अन मनात तळे सचवून जातात..
=============================================
खोटी आस तुझी    तुझ्यासारखीच लबाड
कोरड्या दुष्काळागत   पाऊसाची सर माझ्या जीवनात
=============================================
तुला विसरण्याचा    केलेला मी प्रयत्न
म्हणजे ........
स्वतःलाच जाणून बुजून फसविण्याचा निष्फळ प्रयत्न..........
तू माझ व्हावं.. तू माझ व्हावं.. Reviewed by Hanumant Nalwade on May 26, 2012 Rating: 5
Powered by Blogger.