एक आठवण जागवून गेली

आज अचानक भल्या पहाटे एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध आपसूकच दाखवून गेली सांग ना !

काय तुझे आणि माझे नाते उमजेल का, कधी मला ते
करून करून विचार जेव्हा कधी नव्हे ते थकलो

गालांवरचा पाऊस मी थांबवू नाही शकलो
मॆत्रीचे हे नाते अपुले का आज एकतर्फी वाटले


पहाटेच्या या ऒल्या शणी का कातरवेळ्चे ध्यास लागले
का तुझ्या डोळ्यात आज शोधतोय मी पाऊस गाणे

धुक्याच्या या ओंजळीमध्ये प्रेमरूपी दव थेंब माझे
सापडेल का या शणांना कधी एक गोड किनारा

गालांवरच्या पावसाला सावरणारा एक जिव्हाळा.
Share on Google Plus

About Hanumant Nalwade