प्रेमात कधी कधी

या सुंदर जीवनात कधी कधी..पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत

विचारात गुंतल्यासारख कधी कधी अन पाहताना तिच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी.. रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच...

जागुन अशी रात्र काढावी कधी कधी नंतर "जागली होतिस का रात्री?"
म्हणून विचारावे कधी कधी..मागायचा असतो देवाकडे..

हात तिचा चोरुन कधी कधी द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी.. चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या

विषय तिचा निघाल्यावर कधी कधी असते रागवायचे लटकेच"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी
विरहात तीच्या ...असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..
पडायच असत प्रेमात कधी कधी बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..
Previous Post Next Post