हल्ली कविताच सुचत नाही.
शब्दांच्या या दुनियेत, मन माझे रमत नाही कविता करायला,
शब्दांच्या प्रवासात ओळ काही मिळत नाही, वेचली अनेक शब्द फुले
पण शब्द शब्दाला जुळत नाही खेळ हा शब्दांचा, मनाला कळत नाही,
 
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!
रचल्या शब्दांच्या ओळी, पण यमक काही जुळत नाही,
लिहिलेल्या कवितांना मग अर्थ काही उरत नाही,
कशी आहे हि वेळ, सरता सरत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top