Monday, November 25, 2013

तल्लीनता

क्षत करूनी कोणी घाव उरी ठेवावा
भयग्रस्त एकांताचा शरीरी काटा रहावा |

जळणार्‍या मेणबत्तीने मेणाइतकेच जळावे
न सांगताच भाव आपसूक कुणा कळावे |

तळहाती जलबिंदूने मौत्यक रूप धरावे
माडीवरील मोगर्‍यानेही निर्माल्यी पावावे |
 

कोवळ्या किरणांनी क्षणभर सोनेरी व्हावे
राखराखीत मरुभुमीस म्रुगजळाचे स्वप्न दिसावे |

एकरूप इतके पावावे शरीरच सैलवावे
सहवासाच्या आठवानी मन भरून यावे |

इतुके व्हावे तल्लीन विश्वच यावे शरण
निद्रेस कवटाळताच अवचित गाठावे मरण |
Reactions: