स्वप्न.

स्वप्न...!!!

बघता बघता आकाष हे निळे ढगांनि भरले रंग सावळे
बरसुनी येती सर सर धारा छेडती तुझ्या आठवणींच्या तारा
मी तुझ्या त्या आठवणीत भिजावे ओल्या मनी या स्वप्न रुजावे
हळुच तु त्या स्वप्नी यावे क्षितीजावरती चल म्हणावे
धुंद झालेल्या श्रावणात त्या बेधुंद होऊन आपण भिजावे
येताच झुळुक गार हवेची नकळत तु मझ्या मिठीत शिरावे
दडलेलं गुपित तुझ्या मनी या किलकिलत्या डोळ्यांनी मला सांगावे
अबोल शब्दांच्या स्पर्षातुन मग तुझे नी माझे प्रेम फुलावे
उधळुनी श्वासांची मूक्त फुले तु कुशीत मझ्या विरुनी जावे
विस्मरुन साऱ्या जगास मग या तुझ्यात फ़क्त मी हरवुनी जावे
खुलतील डोळे अलगद जेंव्हा स्वप्न न्हवे हे सत्य असावे
अशा त्या सोनेरी क्षणांसमोर इन्द्रधनुही वेडे फ़िके पडावे...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade