एकाचे तरी देशील का

एकाचे तरी देशील का ?
जीतकी ओढ मला तुझी तितकीच तुलाही आहे का ?
जीतके प्रेम माझे तुझ्यावर तीतकेच तुझही आहे का ?
मी समोर नसतानाही मला कधी पाहतेस का ?
उत्तर रात्रि शान्तसमयी स्वप्नात मला पाहतेस का ?
ऎक क्षण मी दिसाव , म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण सम्पुच नये, असा विचार कधी करतेस का?
एकान्ती आपल्या गुजगोष्टी,आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने, मोहरुन कधी जातेस का ?
माझा वेडेपना आठवुन, स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे, असे कधी ठरवतेस का ?
काळही सगळा सम्पुन जायील, विचारणे माझे सम्पनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे, उत्तर एकाचे तरी देशील का ?
एकाचे तरी देशील का एकाचे तरी देशील का Reviewed by Hanumant Nalwade on May 26, 2012 Rating: 5
Powered by Blogger.