*बघ तिला सांगून*...
किती दिवस पाहणार तिला तू खिडकीतून
तो ही गुलाब जाईल एक दिवस कोमेजून
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून...!!
...
किती दिवस बोलणार तू पडद्याआडून
पोहोचवशील जरी भावना तिला दुसर्यांकडून
"थँक्स" म्हणेल तुला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदा तरी
बघ तिला सांगून...!!

किती दिवस घालणार तू वायफळ बोलून
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढून
एवढ्यात जाईल कोणीतरी तेच तिला विचारुन
म्हणून म्हणतो एकदा तरी
बघ तिला सांगून...!!
 

गूगल ऐडवर्ड्स

 
Top