कुणीतरी हवं असतं

कुणीतरी हवं असतं, जीवनात साथ देणारं
हातात हात घेऊन, शब्दाविना बोलणारं....

कुणीतरी हवं असतं, जीवाला जीव देणारं
फुलातल्या सुगंधासारखं, आयुष्यभर जपणारं....

कुणीतरी हवं असतं, हक्कानं रागवणारं,
चुका झाल्या तरी, मायेन समजावणारं....

कुणीतरी हवं असतं, आपलं म्हणणारं
नजरेतले भाव जानुन, आपल्याला ओळखणारं....

कुणीतरी हवं असतं, बरोबर चालणारं,
कशीही वाट असली तरी, मागं न फिरणारं....

कुणीतरी हवं असतं, वास्तवाचं भान देणारं,
कल्पनेच्या विश्चातही, माझ्यासंगे रमणार....

कुणीतरी हवं असतं, मनापासुन धीर देणारं,
स्वतःच्या दु:खातही, मला सामावुन घेणारं....

कुणीतरी हवं असतं, एकांतातही रेंगाळणारं,
माझ्यासोबत नसतानाही, माझ्यासोबत असणारं....

कुणीतरी हवं असतं, विश्वास ठेवणारं,
माझ्या विश्वासाला, कधीही न फसवणारं....

कुणीतरी हवं असतं, मला समजुन घेणारं,
आयुष्याच्या वाटेर साथ देशील का विचारणार.....
कुणीतरी हवं असतं कुणीतरी हवं असतं Reviewed by Hanumant Nalwade on March 03, 2012 Rating: 5
Powered by Blogger.