मी हो म्हणलं म्हणुन

मी हो म्हणलं म्हणुन..तु हो म्हणायलाच पाहिजे, अशी काही सक्ती नाही...
प्रेम काय.! काल होत, आज आहे ,उद्याही होईल..
करायलाच पाहिजे.. अशी काय ती देवाची भक्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....

... तुझ्यात मी आणि तु माझ्यात तुला शोधायचीस, भेट नाही घडली की, अगदी कासावीस व्हायचीस.
आठवत तुला ते खाली उतलेलं आकाश ,तलावातील चांदणं..
अगदी सुर्य घरी परतल्यावरही,चालु राहिलेलं आपआपसातलं बोलणं..
तुझ्या माझ्या आठवणीखेरीज, हृदयावर कोणाची जप्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....

काहीनाही फक्त आठवण देण्याकरीता ग, तुच म्हणायचीस.. स्वप्नात काय..,
डोळे उघडे असतांनाही तुच दिसतोस. माझ्या श्वासा श्वासात, तु अन् तुच भिनतोस..
जाऊ देना..! जास्तीत जास्त काय होईल, माझा रोल, कुणी दुसरा घेइल.
मीच पाहिजे प्रेमासाठी.. अशी माझ्यात दैवी शक्ती नाही..
मी हो म्हणलं म्हणुन....

आठव तुच म्हणाली होतीस, मैत्रीचं नातं आता प्रेमात बदलतयं..
तरीही मी ठाम नाही. चार पावसाळे जाऊ दे.. तुझं सगळं ठरलं की, उत्तर फक्त आणुन दे..
लवकर उत्तर येण्यासाठी ही काही युक्ती नाही मी हो म्हणलं म्हणुन..
मी हो म्हणलं म्हणुन मी हो म्हणलं म्हणुन Reviewed by Hanumant Nalwade on July 22, 2014 Rating: 5
Powered by Blogger.