तू असा कसा

मनातले प्रेम चेह-यावर
दिसू देत नाहीस,
डोळ्यांनी बोलतोस पण
ओठांवर येऊ देत नाहीस,
तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू
... तरी कसा....!!

सांग ना बे तू
असा कसा......???

फोनवर बरेच सांगतोस पण
प्रेमळ काहीच बोलत नाही
भेटीच्या तारखा ठरवतोस पण
भेटणे काही होतच नाही
आहेस माझा प्रियकर पण भासे जणू मित्र
जसा....!!

सांग ना बे तू असा कसा......???

तुझ्यावर केलेली कविताही तू वाचून नुसता हसतोस,
वाटतं काहीतरी बोलशील पण "छान" बोलून गप्प बसतोस प्रोफेशनल तुझं
वागणं तू रोमांटिक होशीलच कसा...!!

सांग ना बे तू असा कसा......???

आजारी असली जरी मी तरी तू एकदाच फोन करतोस,
त्यातही तब्येत विचारायची सोडून काहीतरीच बडबडत बसतोस,
आहे जसा माझ्या मनातला राजा नाहीच मुळी तू तसा...!!

सांग ना बे तू असा कसा......???

रागावलीच मी तर तुला मुळीच करमत नाही,
मझ्याशी बोलल्या शिवाय तुलाही राहवत नाही,
समजून घेते मी तुला कारण मला हि तू आवडतोस असा

सांग ना बे तू असा कसा......???
Share on Google Plus

About Hanumant Nalwade