माझे पहिले प्रेम !!

माझे पहिले प्रेम
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कसा सावरू मी आवरू गं मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा क्षणात सारे उधान वारे झुळूक होऊन
जाती
कधी दूर तू हि कधी जवळ वाटे
पण काहीच नाही हाती
मी अशीच हसते उगीच लाजते
पुन्हा तुला आठवते मग मिटून डोळे तुला पाहते
तुझ्याच साठी सजते तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्ना का हे जगताना मला आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा मनात माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस
आहेस खरा कसा रे
तू इथेच बस ना हळूच हस ना
अशीच हवी मला तू
पण माहित नाही मला हि अजुनी तशीच आहेस का तू नवे रंग सारे नवी वाटे हि हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा......
Share on Google Plus

About Hanumant Nalwade