आयुष्यभर मैत्री टिकव

मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस,,

आयुष्यभर मैत्री टिकव,मध्येच सोडून जाऊ नकोस..

जीवनाच्या एका वळणावर भेट झाली आपली,,

एकमेकांना न बघताच मैत्री झाली आपली,

दिवसेंदिवस बहरत गेली मैत्री आपली,

खूप प्रेम केले मी आपल्या मैत्रीवर,, पण...,

plz , मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस,

आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ नकोस,,

सर्वजण म्हणतात, मैत्री म्हणजे प्रेमाची सुरुवात असते,

खरे कि खोटे माहीत नाही मला,

पण खरच तस असेल, तर मग मैत्रीला काहीच किंमत राहत नसेल अस वाटत मला,,

असो, मी मात्र कायम आपल्या मैत्रीमधला मित्रच राहणार, तुझी जीवापाड काळजी घेत राहणार,, पण...,

plz , मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस,

आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ नकोस...

कधी कधी जाणूनबुजून तुझ्याशी जवळीक साधण टाळायच,

कामात असताना पण शरीर इथे, मन मात्र तुझ्याजवळ असायचं,

कायम तुला हसवायचा प्रयत्न करतो, कायम तुला सुखात बघण्यासाठी देवाकडे हात जोडतो,

हे आहे माझ आपल्या मैत्रीमधल प्रेम,, पण ...,

plz , मैत्रीमधल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस,

आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ नकोस...

कधीतरी वाटत पडशील चुकून तू माझ्या प्रेमात,

रंगवशील तुझी स्वप्न माझ्यासोबत, तुझ्याच स्वप्नात,

आतुर होशील नकळत ऐकण्यासाठी माझा होकार,

पण कसा सांगणार तुला माझ्या होकारामाध्ला नकार,,

सहन तुला होणार नाही, हरवून बसशील स्वतःलाच जीवनभर,

आणि तोच क्षण असेल आपल्या मैत्रीमधला, जेव्हा..,,

मी बनेल अळवाच पान आणि तू बनशील पावसाची एकच सर,,

दोघेही गमावून बसू एकमेकांना आणि आपल्या मैत्रीतल्या प्रेमाला,, म्हणूनच सांगतो पुन्हाएकदा,,

plz ,मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस,

आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ नकोस...,

आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ नकोस.........
Share on Google Plus

About Hanumant Nalwade