माझ्या मित्राच्या एका जुन्या एसएमएस वरून. !!

माझ्या मित्राच्या
एका जुन्या एसएमएस वरून...
एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे
वडील ट्रेन ने जात असतात.त्यांच्या समोर
एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं.
... तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर
बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे
मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त
हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून
नवल वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण
आणि हा अगदी लहान
मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर
बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते
बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...”
तेव्हा समोर
बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”त
ुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर
कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
आम्ही आता डॉक्टर कडूनच
आलो आहोत..माझा मुलगा जन्मापासूनच अंध
होता आणि त्याला दोनच दिवसांपासून
दिसायला लागले.”
(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका...
सत्य कदाचित
तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..)
Share on Google Plus

About Hanumant Nalwade