जाता जाता आठवण म्हणून डोळ्यांत अश्रू तू देऊन गेलास
माझ्या मनाला माझ्यापासूनच परकं करून गेलास

रुसले हे मन माझे माझाशी आज बोलत नाही
तू न माझा राहिलास हे त्या वेड्याला पटत नाही


कितीही समजावले तरी माझे तो मानतच नाही
तुझ्याच विचारात राहतो माझे दु:ख त्याला कळतच नाही

वेडं हे मन माझे तुझी वाट पाहणं सोडत नाही
तू परत कधीच येणार नाही कदाचित त्याच्या मनालाही हे पटत नाही

गूगल ऐडवर्ड्स

 
Top