एक दुपार अशीच
सरत्या मे महिन्याची
मी खिडकीपाशी वाचत बसलेले
इतक्यात चाहूल लागली पावसाची
हवेत आलेल्या गारव्याने
उन्हाची काहिली ओसरली
तळपणार्या सूर्याची
कृष्ण्मेघांनी चांगलीच जिरवली
सोसाट्याचा वारा सुटला
बटांशी माझ्या खेळू लागला
त्या अलवार स्पर्शात
त्याचा भास झाला
बघता बघता
जलधारा बरसू लागल्या
टपोर्या थेंबांनी
धरती भिजवू लागल्या
झाडपान रस्त्यासोबत
त्यांनी हवेलाही नाही सोडलं
उरात दडवलेल्या आठवणींना
हलक्या सरींनी जागवल
नकळत हातातल पुस्तक मिटल
मन भूतकाळात हरवल
ओल्या मृदगंधासोबत
आठवणींच अत्तर दरवळल
पहिल्या पावसाच
हेच तर अप्रूप असत
पहिल्या प्रेमाशी त्याच
खूप जवळच नात असत