तुझी मैत्रि म्हणजे

आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर
वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात माझ्या हक्काच असं
काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक
धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास
दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही...
मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ...
करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय
नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे
शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे
शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार
अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात
एवढीच देऊ शकतो तुला खात्री ...........

Share on Google Plus

About Hanumant Nalwade