रात्र बरीच झाली होती

रात्र बरीच झाली होती पौसही कोसळत होता
झालो क्षणातच एकरूप आम्ही कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...

खुप समजावले मी तिला नको भिजुस या क्षणाला
ऐकायचेच नव्हते तिला कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...
राहिलो एकटा आडोशाला उभा पण पाहत होतो मी फ़क्त तिलाच
भर पडत होती तिच्या सौंदर्यात कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...

अशाच साठवून ठेवीन तुझ्या आठवणी मी माझ्या स्वप्नांच्या डायरीत
तू आणि मी एकत्र असताना कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade