
तू सोडत होतीस केस मोकळे मी मात्र गुंतत गेलो
तुझ्या जादुई हसण्यातच मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात मी हरवत गेलो
तुझ्या पुसटश्या स्पर्शानही मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन -मनात नकळत साठवत गेलो
कळलं नाही हा श्वास कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर मी कसा करत गेलो .