एक स्वप्नासाठी माणूस हरवून जातो,
स्वप्नपूर्ण करण्यासाठी स्वतःलाही विसरून जातो,
स्वप्न होइल पूर्ण म्हणून धडपडत राहतो,
धडपडता धडपडता स्वतःचे स्वप्न ही विसरून जातो.
विसरलेली स्वप्न पुन्हा कधीतरी आठवतात,
जीवनातील दुःख पुन्हा सांगून जातात,
स्वप्नासाठी केलेल्या प्रयत्नांची जाणिव होते,
प्रयत्न करुनही पूर्ण न झालेल्या स्वप्नांसाठी डोळ्यात अलगद पाणी येते.
न पूर्ण होणारी स्वप्न पाहता पाहता डोळेही थकून जातात,
मनातील दुःख मनातच राहते.
आयुष्यभर स्वप्न पाहणारे डोळे स्वप्न पाहता पाहता मिटून ही जातात.
शेवटी काय ? एक स्वप्न अपुर्णच...