Sunday, November 24, 2013

बाकी काही नाही

तुला काय वाटतं... मी मिस् करतोय तुला... ह्ट आठवण येते थोडी बस्स
बाकी काही नाही...
सकाळी उठल्यापासून, झोपेपर्यंत तू मला अजिबात आठवत नाहीस आरशात एकट्याला पहायला त्रास होतो थोडा, बस्स
बाकी काही नाहीय...
दुपारी जेवायला बसल्यावर घास थांबतो ओठांजवळ पण भाजी बरोबर नसते यार खानावळीची,
तोंड अळणी होतं थोडं, बस्स खरंच तुला मिस् नाय करत मी... खरंय आता एकट्याला रफी, गिता नको वाटतात... पण लाऊडस्पिकर लावतो मी रात्री जीव दंगला गुंगला ऐकताना, थोडी हूरहूर होते बस्स !
बाकी काही नाही... माझा मोबाईल गंडलाय डब्बा झालाय त्याचा हे आता तु न सांगताच समजतंय मला
साला, कधी पण तुझी रिंग वाजवतो तो गंडलाय, पण मी नाय गंडलो मेमरी थोडी विक झालीय, बस्स !
रात्री न जेवता उंबऱ्यात गेल्यावर, काहीतरी आठवतं.. बंद दारापुढे डोळेही बंद होतात...
तुला अजिबात मीस नाय करत मी... रात्री बेडवर पडल्यावर उशीवर पापण्या भिजतात पाण्यानं...
अलिकडं घरातही दव पडू लागलंय बहुधा मी खरंच सांगतोय, अजिबात मिस नाही करत तुला...
तुला काय वाटतं... मी मिस् करतोय तुला... ह्ट थोडी आठवण येते बस्स !
बाकी काही नाही....
Reactions: