कोजागिरी पौर्णिमा असे नांव पडले

आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात.या दिवशी
रात्री इंद्राची पूजा करतात.
पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा  नैवेद्य दाखवायचा असतो.

मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडळातून  पृथ्वी वर उतरते व
`को जागर्ति’? कोण जागं आहे? असा प्रश्न विचारते
जो जागा असेल त्याला जी धनधान्य देते. यावरून कोजागिरी पौर्णिमा असे नांव पडले.

आश्विन महिन्यात पावसाळा संपतो. त्यामुळे आकाश निरभ्र असते
व स्वच्छ चांदण असते अशा चांदण्यारात्री  इष्टमित्रांसह मौजमजा करण्याच्या दृष्टीने
हा उत्सव साजरा करतात.

राजस्थान मध्ये स्त्रिया या  दिवशी शुभ्र वस्त्र धारण करून चांदीचे अलंकार घालण्याची प्रथा आहे.
Previous Post Next Post