Monday, September 30, 2013

मी अंताकडे जात आहे

का माहित का आज असे वाटत आहे
कि मी एकटा पडलो आहे...
सारे मित्र असूनही मी एकटाच आहे
का माहित का आज..?

मन कुणामुळे तरी उदास झाले आहे
गरज आहे कोणाची मला असे का वाटत आहे...
राहून राहून कोणाची तरी आठवण येत आहे
असे का होत आहे..?

का माहित नाही जग वेगळे
आणि मी वेगळा झालो आहे
कोणाची तरी साथ हवी आहे मला...
पण कोणीच दिसत नाही
का माहित का मी एकटाच पडलो आहे..?

कोणीच का साथ देत नाही मला
देणारे हात सुद्धा मागे पडले आहेत...
जे होते प्रिय ते सुद्धा सोडून गेले
सांजेचा सूर्यही अस्ताकडे जात आहे
मला वाटते कि मी अंताकडे जात आहे..
Reactions: