स्वप्नांत तुला भेटणं आता दररोजच झालंयनसनहि तुझं आजकाल असण्यासारख झालंय
....जगणं तुझ्याशिवाय कठीण होऊन बसलंय
मराव वाटतय पण मरणही दूर जाऊन वसलंय.......
कस असत ना..,.,.......
कोणी न कळत आयुष्यात येत...........
न कळत आपल्या मनात जागा करत......
आपल मन जिंकत.......आणि मध्येच एका क्षणात सोडून
जात.......
अरे विचार कधीतरी "होशील का माझी",
मग मी अबोलच राहून लाजेन जराशी.
उगीच ओढणी रुमालाशी करीन मग चाळा,
पण तू टिपायचा डोळ्यातील घन ओला.
लाजायचं वगैरे माझं काम आहे,
कसं ना कळे हा सोपा तुला मसला.
उद्या पुन्हा येशील, तसाच बसशील, गोड हसशील.
पण कोणास ठाऊक, मनातलं सारं कधी विचारशील...