डोळ्यांतून वाहून जातात

तासनतास गुंतते मन तुझ्या मनाच्या बेटावर
कधी नदी काठावर, तर कधी एखाद्या घाटावर…
उरतो मी न माझा सोबती तुझा सुवास
जागतो रात्रन रात्र, ध्यानी फक्त तुझाच भास…
जुन्या आठवणी रात्री हरवून जातात,
हृदयातल्या वेदना डोळ्यांतून वाहून जातात...
कधी मनाचे दरवाजे उघडे ठेऊन ऐक,
शब्द ही मुके होऊन खूप काही बोलून जातात...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade