Wednesday, August 28, 2013

तु समजुन का घेतले नाही

तुटलेल्या ह्रदयाला,जोडता आले नाही,
मोडलेल्या मनाला,सावरताच आले नाही.....
तु सोडून गेल्यावर,माझे असे काहीच उरले,
सर्वकाही असुनही जवळ माझ्या,प्रेमाशिवाय काहीच तु घेतले नाही.....
तुझ्याशिवाय जगताना मला,जरा देखील करमले नाही,
की एक क्षण तुझ्याविणा,कधीच राहवले नाही.....
कधी तुझा ईतका आधीन झालो,मला माझेच कळले नाही,
स्वतःलाच तुझ्यात विसरलो मी,अस्थित्वच माझे उरले नाही.....
मी सुखच सुख दिले तुला,दुःखाशिवाय तु काहीच मला दिले नाही,
कोणता दिवस असा नाही गेला,ज्या दिवशी मी तुला आठवले नाही.....
जन्मोजन्मीच्या नात्याला तोडलेस तु,असे करताना तुला काहीच वाटले नाही,
ठेवलीस सारी स्वप्ने अधुरीच,जी स्वप्ने कधीच पुर्ण झाली नाही.....
का असा खेळ मांडलास प्रेमाचा,का विरहाचे घाव दिलेस मला,
प्रेम करत होतीस ना माझ्यावर,मग मला तु समजुन का घेतले नाही.....
मला तु समजुन का घेतले नाही.....
Reactions: