Friday, August 16, 2013

एकदा देव म्हणाला

एकदा देव म्हणाला.....
.
"रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करतोस माझी
न चुकता तिच्यासाठी काहीतरी मागत असतो...!
कधी तरी चुकून स्वता: साठीपण काही मागत जा...!
.
त्याला मी म्हटल,
.
तिच्याशिवाय माझे आयुष्य तरी आहे का...?
.
मला झोपायला तु जमीन दिलीस तरी चालेल ....
पण तिला तू मखमली पलंग दे,
.
मला दिवसभराची भूक दिलीस तु तरी चालेल ...
पण तिला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
.
मला तू भले अंधारात ठेव...
पण तिच्यासाठी न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
.
माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल ...
पण तिला नेहमी आनंदात ठेव,
.
माझ्यातला जीव घेतलास तु तरी चालेल ...
पण तिच्या हृदयात माझे स्थान तु असेच ठेव,
.
माझे मागणे ऐकून देव पण थक्क झाला,
कधी न रडणाऱ्या देवाचे डोळे पण तेव्हा पानावले,
.
का करतोस रे इतके प्रेम तिच्यावर..?
तिने प्रेम तुझे स्वीकारले नाही..!
का मरतोस रे तिच्यासाठी..?
जीने जगणे तुझे मान्य केले नाही..!
.
मी म्हटलो
.
सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला तेव्हाच भेटतील,
जेव्हा तू पण कुणाच्या ख-या प्रेमात पडशील.....

Reactions: