तू मला का आवडतोस

तू मला का आवडतोस? मला नाहीमाहित, पण खूप आवडतोस, इतकचमला माहित... ना तू राजकुमार,

ना तू खूपसुंदर, तरीही तू खूप छळतोस मला, किती लाजल्यासारखं होतं माहितीय??? हळूच तिरक्या नजरेने जेव्हाबघतोस मला.

मिठीत तुझ्या काय सांगू...वाटतं कसं? देठावर कळीने अलगत उमलावं तसं, स्पर्शाने तुझ्या काय

सांगू...वाटतं कसं? मयूरपंखाने अंगावरून सरकावं तसं... मीकाहीहीकेले तरी तुला ते सुंदरच वाटते, तुज्यासोबत मी न जाने कितीदा संसार थाटते...

तू नेहमी विचारतोस ना मी इतकी सुंदर कशी? सुंदर नाही रे मी... प्रेमात मला पाहताना तुझी नजरच तशी. आवडतं मला तुझं...

माझ्या स्वप्नात येणं, माझा हात चालता चालता तुझ्या हातात घेणं हे सगळं असंच मला आयुष्यभर देशील का? स्वर्ग नकोय मला...

असंच नेहमी तुझ्या मिठीत घेशील का? अक्षरश: वेडी आहे मी तुझ्यासाठी, फक्त एक कर माझ्यासाठी...

बाकी काही नाही दिलेस तरी चालेल, फक्त खूप आठवणी दे मला... मरतानाहसण्यासाठी..

Share on Google Plus

About Hanumant Nalwade