कधीही अनुभवावं

समोर असताना मीसारं काही विसरावं.. तिने इश्य करत लाजावं.. मी‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं .. तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं.. कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं.. तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं.. सोबत तिच्याहरवूनच जावं .. तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं.. अदांवर तिच्या कोणीही फिदा व्हाव... तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं.. अश्रूंनीतिच्या कोणालाही वाईट वाटावं.. तिचं हसणं कोणालाहीसुखवावं.. गालावरल्याखळीत तिच्या कोणीही घसरून पडावं.. तिच्या नजरेने मलाच शोधावं.. अचानक नजरेने नजरेला भिडावं .. मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं.. तिने फक्त माझंच रहावं.. मीहीफक्त तिच्यासाठीचजगावं.. साथ देऊ जन्मोजन्मी .. विरहाचं दुख कधीही न यावं.. कधीही न अनुभवावं..
कधीही अनुभवावं कधीही अनुभवावं Reviewed by Hanumant Nalwade on July 24, 2013 Rating: 5
Powered by Blogger.