पहिले ना कधी मला जरी तू सये आसवे ढाळताना
पेटविले पापण्यात सरणं एकट्याने तुला टाळताना

संग्रही ठेवून शब्दकोश भावनांचा फिरलो वणवण
दिसलो निवांत कसा तुला मी आयुष्य चाळताना

भरण्यास घाव तुझे हे कसले म्हणून उपाय आज
कळले ना भाव डोळ्यातून तुजला हात सोडवताना

वाहताना कळले मजला सये सोडायचे मागे सारे
ठरविले गुन्हेगार जेव्हा दिसलो किनारे जोडताना

साहताना सारेच डगमगलो नाही जरी आजवर मी
काळजात रुतला काटा खोल म्हणे फुले माळताना

प्रतिबिंबित जे आरश्यात ना झाले लपविले इमाने
दिसले जगा पाहिले जेव्हा शब्द श्रावणात वाळताना.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top