तुला जायच होत त्या वाटेने गेली तु निघुन मी माञ वेड्या आशेवर थांबलोय उगा अजुन कुणी काय गमावल, ह्याला आता काहि अर्थ नाही मी तुझ्याच फसव्या आभासांवरच जगतोय अजुन दाटुन येती मनात आठवांचे क्षण काहि लपवतो मी आसवांना पावसात चिंब भिजुन तु नाहीस जरी सोबत तरी भासांतुनी साथ तुझी नेहमीच तु दिसतेस स्वप्नांत चेहरा लाजुन हि सजा गुंतल्या मनाची, कि हरवल्या धुंदक्षणांची कोड हे सोडवताना किती राञी गेल्या निघुन तु निघालीस त्याच वळणावर आहे मी अजुन थांबलेला वाटत मागे परताव पण पावल जातात थिजुन बघ एकदा तुही कधी माझ्यासारख जगुन वेडावल मन तरी शहाण्यासारख वागुन मग तुला जाण येईल या विरहाचे दु:ख वेडे सोसशील जेव्हा वेदनांना तुझहि मन बदलेल थोडे.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top