मी एकटाच असेन..

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील
पण "ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित
मी एकटाच असेन !

तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित
...
मी एकटाच असेन !

लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट
पाहणारे बरेच असतील पण ,
"जपून चाल " सांगणारा कदाचित
मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर
देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच
असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade