रंग त्या मैत्रीचा.

मैत्री! एक गोंडस नाव, एका नात्याचं. रम्य बालपणात; त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं आपल्याबरोबर, नाही? या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा. समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून. मग वाळू सोडून नावेत बसतो आपण; लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच. पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला. कायमची चुकामूक. मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं, एवढंच उरतं आपल्या हातात. पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन. आणि जसा जसा आयुष्याचा किनारा जवळ येऊ लागतो, तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा.
Previous Post Next Post