प्रेमाची लक्षणे.

प्रेमाची लक्षणे..... You are in Love

कधी कधी आपल्याला काहीच सुचत नाही...मन कुठं तरी गुंतून पडतं... कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही... आपण स्वत:शीच बडबडतो... मनात 'कुछ कुछ होता है' च्या भावना निर्माण होतात...तिच्या स्वप्नात राजकुमार

येतो तर त्याच्या स्वप्नात अप्सरा येते... तेव्हा आपण कुणाच्या तरी प्रेमात पडलो असून आपल्या आयुष्यात 'कुछ कुछ नही, बहूत कुछ हुआ है' यांची जाणीव आपल्याला होत असते.

मात्र, अडीच अक्षराचे 'प्रेम' सुरवातीला समजायला फारच कठीण जात असते. कारण आपण तेव्हा प्रेमाच्या पहिल्या वर्गात प्रवेश केलाला असतो. प्रेमाच्या विश्वात आपले पहिले पाऊल असेल तर आपण पार गोंधळून जातो. सुरवातीला तर काहीच कळत नाही की हे काय सुरू आहे. 'त्याच्या' किंवा 'तिच्या' पहिल्या भेटीतच आपल्या जीवनात 'प्रेमाचा बहर' यायला लागतो. सारे जीवन बदलून जाते. 'तो' किंवा 'ती' दिसली नाही की, पाण्याविना मासा अशी आपली अवस्था होते. आधी तर असे कधी झाले नाही. मग आताच का? असं का होतय, असे कोडे आपल्याला पडते. याला कुठला आजार म्हणावा? आपल्याला 'लव्ह फिवर' तर झाला नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या डोक्यात पिंगा घालू लागतात.

एवढ्यावरून आपण कुणाच्या तरी प्रेमात पडला आहात हे आम्ही सांगू शकतो. नक्कीच आपल्याला प्रेमाची लागण झाली आहे. परंतु, गोंधळून जाऊ नका. पहिल्या प्रेमाची लक्षणे असतात तरी कोणती? असा प्रश्न आपल्याला पडणे सहाजिकच आहे. म्हणूनच खाली दिलेली लक्षणे तुम्हालाही लागू होत असतील तर नक्कीच तुम्ही प्रेमात पडलाय.

* मन कुणाची तरी वाट पाहतय, 'तो' किंवा 'ती' कधी येणार म्हणून मन बैचेन झाले आहे. आपल्या सभोवताली सगळं काही असताना कुणाची तरी कमतरता भासत असते.

* घरात किंवा मित्रमंडळी 'तिचा' किंवा 'त्याचा' उल्लेख होताच आपल्या चारही बाजूना प्रेमाचा सुगंध यायला लागतो. 'त्याचे' किंवा 'तिचे' नाव कानावर पडताच आपला चेहरा लाजराबुजरा होतो तर अचानक तो समोर येऊन उभा ठाकला म्हणजे हृदयाची स्पदंने एकदम वाढतात व आपली बोबडी वळते.

* रात्रीचा दिवस होतो परंतु आपला डोळ्याला डोळा लागत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर करण्यात आपली रात्र जाते. जागे परी त्याचे स्वप्न, झोपी गेल्यावर ही त्याचेच स्वप्न मग अशा वेळी करावे तरी काय?

* 'तो' किंवा 'ती' डोळ्यासमोर असली म्हणजे मन कसे प्रसन्न अन् 'तो' किंवा 'ती' दृष्टीआड होताच मन सैरभैर होते.

* आपण नेहमी कवितेकडे पाठ फिरवणारे आपण ग्रंथालयात जाऊन कवितासंग्रह मागतो. दिवस-रात्र प्रेमगीते ऐकतो व गुणगुणतोही. 'प्यार का पहिला खत लिखने में वक्त तो लगता है..!' ही गझल गाणारे जगजीतसिंग आपले 'फेव्हरेट' होऊन जातात.

* रोमॅंटिक चित्रपट पाहून त्यातील हिरोइनच्या जागी 'ती' व हिरोच्या जागी 'तो' आहे. असे समजावेसे वाटते.

* कॉलेज कट्टयावरील त्याला पहाण्यासाठी डोळे भिरभिरतात व नाकाच्या सरळ रेषेत जाणार्‍या तिला पाहून 'तो' तिचा दिवाना होऊन जातो.

* अचानमक परमेश्वरावर आपला विश्वास बसतो. आपल्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल घडतो.

* आपण 'तिच्या' किंवा 'त्याला' आवडेल असे राहायला लागतो.

* 'त्याच्या' किंवा 'तिच्या' विचारात आपण तहान भूक सगळं काही विसरून जातो.

* 'तिच्या' किंवा 'त्याच्या' व्यतिरिक्त आपल्याला कोणाशीच बोलायला आवडत नाही.

* 'त्याची' किंवा 'तिची' चुकीची गोष्टही आपल्याला बरोबर वाटते. 'त्याची' किंवा 'तिची' प्रत्येक अदा आपल्याला भारावून टाकते.

* आपण स्वत:ची जरा जास्तच काळजी घ्यायला लागतो.

जर वरील सगळी लक्षणे तुम्हालाही लागू होत असतील तर नक्कीच तुम्हालाही 'लव्ह फिवर'ची लागण झालीय हे समजून घ्या.
Share on Google Plus

About Hanumant Nalwade