भावना सत्यात आव्तरतात..
मनात साठलेल्या भावना,
हळू हळू मग बाहेर येतात...

शब्द बोलू लागतात तेव्हा...
कल्पनेला सीमा नसते...
कल्पने पलीकडची दुनिया,
मग शब्दांच्या मदतीने बनते ...

शब्द बोलू लागतात तेव्हा...
मन हि हसू लागत,
वेड तेही मग,
शब्दांच्या दुनियेत रमू लागत...

शब्द बोलू लागतात तेव्हा...
मी हि त्यांच्यात हरवतो...
कल्पने पलीकडची दुनिया,
मग मी शब्दांन बरोबर पाहतो...

शब्द बोलू लागतात तेव्हा...
बाकी कोणीच बोलत नाही..
स्तब्ध झालेलं मन,
भानावर येताच...
वेड्यागत हसन,
मला काही रहावत नाही...
वेड्यागत हसन,
मला काही...
.... रहावतच नाही....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top