माझा काय गुन्हा होता.

जीवनात माझ्या कधी आलास मलाच माझे कळले नाही आनंद जणू माझ्या ओंजळीत होते
दु:खाचे सावट जणू दूर दूरवर नव्हते वेड्या मनाची आस होती कधी तरी तू हे बोलशील
... पण मीच किती वेडी होती तुझे मनच जाणले नाही आणि माझे मन राहवले नाही
आनंदाचे क्षण किती कमी असतात ते पहिल्यांदाच जाणवले सुंदर माझे स्वप्न
किती लवकर भनगले माझा काय गुन्हा होता? विश्वाश तर तुझ्यावर केला होता
जगाच्या काय मर्यादा असतात नाजूक मनाला कधी कळल्या नव्हत्या तू न माझा होतास
हे जेव्हा कळले मीच न माझे राहीले अश्रुनी मला जवळ घेतले आनंद जणू दूरवर गेले
माझा काय गुन्हा होता? माझा काय गुन्हा होता?
Share on Google Plus

About Hanumant Nalwade