पाऊस होता तिच्यावर रुसला,
रात्र भर तो बरसत बसला,
तिला नाही आली कीव त्याची,
काहीहि नाही बोलली ती त्याच्याशी...
बरसून बरसून थकलेला पाऊस,
मग माझ्यापाशी आला,
" माझ काय चुकल? "
अस तो मला हळूच म्हणाला...
मी त्याला बोललो,
"अरे पाउसा,
तुझं काहीच चुकलं नाही,
तू प्रेम केलस तिच्यावर,
जे तिला कधीच कळलं नाही..."
मी दिलेलं उत्तर त्याला काही पटेना,
तिच्याशिवाय त्याला, दुसर कोणीच दिसेना...
बरसून बरसून थकलेला पाऊस,
परत फक्त तिच्याच साठी बरसू लागला...
अन त्याच दिवशी सारखा,
आजही....
तो फक्त तिच्याच शोधात फिरू लागला...
तो फक्त तिच्याच शोधात...
.... फिरू लागला....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top