एकच सांगणं आहे .

कुलूप ...
मग ते दाराला लावलेलं असो की मनाला त्याला उघडणारी 'चावी' एकच ...
आपल्या मनाची बंद पडलेली दारं उघडून थेट आपल्या काळजापर्यंत पोहोचता
 येण्यासाठी लागणारी चावी फार कमी लोकांकडे असते ...
काही ठराविकच लोकं अशे असतात ज्यांच्या चावीला बरोबर आपल्या कुलुपाच्या
अगदी विरुद्ध खाचे असतात ... अश्याच चाव्या मग त्या कुलुपाला अगदी सहजपणे उघडतात ...
एकदा का कुलूप उघडलं की मग सहजतेच ताजं वारं आत प्रवेश करतं ... 
इतक्या दिवसांपासून अंधारलेल्या जगात एका नव्या उमेदीचा उजेड पडतो ...
जुन्या मळकटलेल्या सावल्यांच्या जागी नव्या आठवणी, नवीन स्वप्न येतात ...
अश्या काही आठवणी जमा झाल्या की माणसं लगेच परत कुलूप लावण्याची घाई करतात ...
त्या बहुमूल्य आठवणी फक्त आपल्याच राहाव्यात या उद्देशाने परत कुलूप लावलं जातं ...
अर्थात... त्यात चूक असं काहीच नाही ... 'बहुमूल्य' गोष्टींना फक्त स्वतःसाठी जपून ठेवण्याची माणसाची मूळ वृत्तीच ...

एकच सांगणं आहे ...
कुलुपं लावा ... पण "आपापल्या 'चाव्या' जपा" !!!!
कारण एकदा जर चावी हरवली तर ते कुलूप तुम्हाला स्वतःला देखील उघडता यायचं नाही ...
आणि जास्त दिवस असं बंद पडून राहिलेल्या इमारतींच 'खंडहर' व्हायला वेळ लागत नाही !!!

(¯`♥´¯)...s
 .`•.¸.•´(¯`♥´¯) ..n
******.`•.¸.•´( ¯`♥´¯)..ss!w
 ************.`• .¸.•´(¯`♥´¯).!
*************** ***.`•.¸.:*
Previous Post Next Post