मला पहाचय तिला एकदा पावसात भिजताना,

सर-सरनार्या सरींमध्धे ओली-चींब होताना…
पहिल्या वहिल्या पावसात,  ती नाच नाच नाचेल
चेहेर्यावरचं हस्य तिच्या, आणखि खुलुन उठेल..
पाउस सुध्धा वेडा होईल, तिला ओली करताना..

मला पहाचय तिला एकदा, पावसात भिजताना…

भिजता भिजता हळूच, ती केसं मोकळे सोडेल..
डोळ्यावरची ओली बट, हळूच मागे सारेल..
उर्वशीही लाजवेल बिचारी, तिचं मोहक रुप बघताना,

मला पहाचय तिला एकदा, पावसात भिजताना…

भिजता भिजता कदाचीत, ती माझी आठवन काढेल..
बरसनार्या त्या पावसालाही, मग माझाच हेवा वाटेल..
पण,ख्ररच माला आठवेल का ती? अस काही घडताना..

मला पहाचय तिला एकदा, पावसात भिजताना…

पावसाळा चालू झाला की, तिचेच विचार मनात येतात..
नकळतच डोळे माझे, उगाचच पाणावतात..
पण,माझ्या भावना कळतात का तिला?
मी तिच्या आठवनीत भिजताना..

मला पहाचय तिला एकदा, पावसात भिजताना…

कधीतरी पावसात ती, माझ्या सोबत असेल..
मी तिच्या प्रेमात आणि, ती पावसात भिजेल..
पुर्ण होईल का माझ स्वप्न?
मी या जगात असताना..

मला पहाचय तिला एकदा पावसात भिजताना,
सर-सरनार्या सरींमध्धे ओली-चींब होताना…

गूगल ऐडवर्ड्स

 
Top