शेवटची भेट.


मला ती आज शेवटच भेटणार होती
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं"सांगितल तरी ऐकत नव्हता
तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं
कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत
होती
अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर
झाले
तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या
"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली
ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!"ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली
का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं
"अछ्चा माझं लग्न ठरलय"!
तिने हसत सांगितल
माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली
नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली....
Previous Post Next Post