तुझे बहाणे.

लाजून हासणे अन हासुन ते पहाणे...
मी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...
मी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...

डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा..
मिटताच पापण्यांनी का चंद्र हि दिसावा..
हे प्रश्न जीव घेणे.. हरती जिथे शहाणे...
मी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे..
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे...
तिरपा कटाक्ष थोडा आम्ही इथे दिवाणे...
मी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...

जाता समोरूनी तु.. उगवे टपोर तारा..
देहातुनी फुलांचा वाहे सुगंध वारा..
रात्रीस चांदण्यांना सुचते सुरेल गाणे..
मी ओळखुन आहे सारे तुझे बहाणे...
.
तुझे बहाणे. तुझे बहाणे. Reviewed by Hanumant Nalwade on July 10, 2012 Rating: 5
Powered by Blogger.