Friday, July 27, 2012

आयुष्य तोकडे हे.

जगण्यास भुल देता, आयुष्य तोकडे हे;
तुजविणं व्यर्थ सारे, मृत्युस साकडे हे.

मज भार ना कळ्यांचा, काट्यास यातना रे;
उमलून दु:ख सारे, जळती उरी निखारे.

मज बोचती उसासे, नि:शब्द तारकांचे;
ति वेदना फुलांची, हुंकार वेदनांचे.

हि वल्गना मनाची, चित्कार भावनांचे;
मि मुक का सहावे, हे खेळ संचीतांचे.

रे कापर्या स्वरांनो, छेडु नका तराणे;
नेत्रात आर्त माझ्या, तिचे मुकसे रहाणे.

उमलेन मी हि केव्हा, चैत्रातुनी फिरोनी,
बहरेन गात्री तिचिया,
ग्रिष्मातुनी झडोनी.
Reactions: