Sunday, July 22, 2012

का आवडतेस इतकी .

कसं ग सांगू ..!!
तुझी काळजी आवडली मला, तुझी हुरुहूर आवडली मला,
तुझं रागावणं आवडलं मला, तुझं समजावणं आवडलं मला,
चेहऱ्यापेक्षाही तुझं मन आवडलं मला.

नेहमी तुझं बोलणं मला खुपवेड लावतं,
नेहमी तुझ्याच सहवासात रहावं वाटतं,
जग मला म्हणेलही वेडा पर्वानाही मला,
इतकंच कळतंय कि "फक्त तूच आणि तुच
हवी मला".

नावापुढे माझ्या मला तुझंच नाव हवंय,
छोटंसंच घरकुल पण ते तुझ्यासोबत हवंय,
किती दिवसाचं आयुष्य माझं मला नाही ग
ठाऊक,
दिवस नाही ढकलायचे ग...मला तुझ्यासोबतचं
जगणं हवंय.

छळ म्हणून तरी एखाद्याने किती ग करावा ?
फक्त स्वप्नातच हात सांगना मी किती दिवस
धरावा ?

मनात ये माझ्या ते कधी न मोडण्यासाठी,
हातात घे हात माझा तो कधी न
सोडण्यासाठी..!!

वाट पाहतोय मी.. तू वाऱ्यासारखी ये, पण
माझ्या जवळच थांब नेहमी..
वाहून नको जाऊस
त्या वाऱ्यासारखी..दुसरीकडे..
Reactions: