तू गेलीस निघून,फक्त आठवण गेली राहून
विचार येता मनात कंठ येतो दाटून
तू होतीस तेव्हा कधीच नाही वाटलं
तेव्हा तुझं प्रेम कधीच नाही जाणलं
गेली ती वेळ निघून,पण आठवण तर येणार
तुझ्याशिवाय सारं नेहमीच अधुरं राहणार
नाही म्हणता कधी आभाळ येतं भरून
तसचं अचानक अश्रु येतात दाटून
प्रयत्न करतोय स्वतःला सावरण्याचा
नाही विसरु शकत, तो भाग आठवणीचा
नाही नाही म्हणता दिवस कसे गेले कळ्ले नाही
तुझी आठवण नाही,असा एकही दिवस नाही
तसेही आता उरले आहेत किती दिवस
तू गेलीस अन जगण्यात नाही उरला रस.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top