त्यांना अद्दल घडू द्या.

प्रेमात पडणार्यांना प्रेमात पडू द्या
प्रेमात पडणार्यांना प्रेमात पडू द्या
एकदा का होयीना त्यांना अद्दल घडू द्या  सारा काही सोप आहे,उगाच गाजावाजा
सागायचं काम माझं ,पहिले मजा मग सजा आपल आपण करून पहाल
होत नव्हत ते भोगून पहाल ज्यांना करायचं आहे त्यांना करू द्या
प्रेमात पडणार्यांना प्रेमात पडू द्या एकदा का होयीना त्यांना अद्दल घडू द्या

सोनेरी मोर दिसतात ,नदी आणि निसर्ग आपल्यावर हसतात
जागा थोडीशी ,पण हृदयात बऱ्याच गोष्टी बसतात रात्रीला तर सोडाच ,दिवसा सुधा तारे दिसतात
ज्यांना पाहायचे आहेत त्यांना पाहू द्या प्रेमात पडणार्यांना प्रेमात पडू द्या
एकदा का होयीना त्यांना अद्दल घडू द्या ,ती हृदयात,आणि करिअर कपाटात
गुलाब सारे सुकून गेले आणि हात तिच्या हातात मोती आणतो हा समुद्राच्या तळातून
पाकिटाला छिद्र पडली,आणि पक्षी आकाशात  ज्यांना उडायचं आहे त्यांना उडू द्या
प्रेमात पडणार्यांना प्रेमात पडू द्या एकदा का होयीना त्यांना अद्दल घडू द्या
हिर- रांझा,लैला -मजनू ,रोमियो -जुलीयेत आम्ही सर्व भाड्याने घेतले
भेटायला तिला आम्ही चेहरे आमचे दहा वेळा धुतले जिगर बाज आम्ही घाबरत नाही कुणाला
तिच्या साठी कितेकदा आमच्या जीवावर बेतले ज्यांना जीव द्यायचा आहे त्यांना देऊ द्या
प्रेमात पडणार्यांना प्रेमात पडू द्या एकदा का होयीना त्यांना अद्दल घडू द्या
तिच्या आवडी निवडी ,आणि तिच्यासाठीच सर्व काही  सारा काही हळुवार ,आणि तिला भेटण्याची घाई
पोट भरत नाही दिवसा बोलून बोलून talk time घेऊन घुबड आमच, रात्रीला तिच्या फोनची वाट पाही
ज्यांना time गमवायचा आहे त्यांना गमाउ द्या प्रेमात पडणार्यांना प्रेमात पडू द्या
एकदा का होयीना त्यांना अद्दल घडू द्या नित हास्य चेहऱ्यावर ,टवटवीत चेहरे
एकच तर केल प्रेम तरी किती पेहरे मित्र हि शत्रू वाटावेत ,मात्र ती गुलाब आणि आम्ही भवरे
ज्यांना बनायचं आहे त्यांना बनू द्या  प्रेमात पडणार्यांना प्रेमात पडू द्या
एकदा का होयीना त्यांना अद्दल घडू द्या .






सल्ला काय द्यावा ,आणि तुम्ही काय घ्यावा  बर झालं तुमच तर आम्हाला हेवा
सहज योग घडून आला आणि योगायोगाने प्रेमात पडलो  हसत रहाव तुम्ही,आम्ही मात्र रडलो
ज्यांना रडायचं आहे त्यांना रडू द्या प्रेमात पडणार्यांना प्रेमात पडू द्या
एकदा का होयीना त्यांना अद्दल घडू द्या...
Previous Post Next Post