Friday, June 22, 2012

मला भेटशील का.

फक्त तू वेळ असेल तुला तर एकदाच मला भेटशील का....
दोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का...?...
पूर्वी तू माझ्याशी खुप काही बोलायचीस वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचीस नसले विषय तरी नविन विषय काढायचीस...
काही ही बोलूंन मला खुप खुप हसवायचीस माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचीस आता कशाला आमची गरज पडेल
असं म्हणून सारख चिडवायचीस, माझा चेहरा पडला तर
खुप नाराज व्हायचीस मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचीस...
आज ही मला तुझा प्रत्येक क्षणी भास होतो का गं अशी वागतेस
का देतेस त्रास नाही पुन्हा भेटणार एकदा बंद पडल्यावर माझा श्वास
शेवटचं एकदाच भेट मला पुन्हा नाही देणार त्रास... वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का दोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का...
शेवटचं एकदाच मला भेटशील का...?
Reactions: